पवार साहेब म्हणतात....देशाचं, राज्याचं राजकारण मला कळतं; पण करमाळ्याचं कळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:42+5:302021-07-31T04:23:42+5:30
बाजार समितीमध्ये घेतलेल्या प्लॉटची थकबाकी चिंतामणी जगताप यांनी भरली नसल्याने ते थकबाकीदार असल्याची तक्रार जयवंतरावांचे चिरंजीव शंभुराजे जगताप ...
बाजार समितीमध्ये घेतलेल्या प्लॉटची थकबाकी चिंतामणी जगताप यांनी भरली नसल्याने ते थकबाकीदार असल्याची तक्रार जयवंतरावांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी पणन संचालकांकडे करून त्यांना संचालक पदावर राहता येत नसल्याचा युक्तिवाद केला आहे, तर जयवंतराव जगतापांनी बाजार समितीत कुटुंबीयांच्या नावे प्लॉट घेऊन आर्थिक लाभ करून घेतल्याने त्यांचे संचालक पद रद्द करावे, असे अपील चिंतामणी जगतापांचे धाकटे बंधू प्रतापराव जगताप यांनी पणन सहसंचालकांकडे केले आहे. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या पत्नीच्या नावावर बाजार समितीत असलेल्या अडत परवान्याचा मुद्दाही पणन मंत्र्यांच्या कोर्टासमोर आला आहे. एवढेच नाही तर बाजार समितीत सचिव नेमणूक जगताप बागल व सावंत गटाने प्रतिष्ठेची केली. करमाळ्याच्या राजकारणात कायबी घडतंय...कोणता नेता, कार्यकर्ते कधी कुणाकडे जाईल हे सांगता येत नाही, म्हणूनच शरद पवार नेहमी म्हणतात, मला राज्याचे, देशाचे राजकारण कळले; पण करमाळ्याचे राजकारण समजत नाही.
- नासीर कबीर, करमाळा