आधी ऊसाची बिले द्या; मगच गावात पाऊल ठेवा: देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:42+5:302021-04-08T04:22:42+5:30
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपकडून दोन मोठे साखर कारखानदार उभे आहेत. त्यांच्याकडे सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची कोट्यवधी रूपयांची ...
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपकडून दोन मोठे साखर कारखानदार उभे आहेत. त्यांच्याकडे सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची कोट्यवधी रूपयांची देणी थकीत आहेत. मात्र, पाण्यासारखा पैसा खर्च करत ते निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे घेण्याची हीच योग्य वेळ असून, आधी आमच्या ऊसाची बिले द्या; मगच गावात पाऊल ठेवा, असे त्यांना सुनावण्याचे आवाहन जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले.
प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्या प्रचारार्थ कौठाळी, शिरढोण, वाखरी, गादेगाव, बोहाळी, कोर्टी, खर्डी आदी गावांमध्ये सभा घेतल्या.
गेल्या काही दिवसांपासून तोंड लपवून फिरणारे तेच कारखानदार आता मतं मागण्यासाठी गावागावात फिरत आहेत. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधी आमची ऊसाची देणी द्या, मगच गावात पाऊल ठेवा, असा आक्रमक पवित्रा घेतला तरच पैसे मिळतील, अन्यथा नेहमीप्रमाणे तुमची फसवणूक निश्चित असल्याचे प्रभाकर देशमुख म्हणाले.
फोटो लाईन :::::::::::::::::
गादेगाव येथील प्रचार सभेत बोलताना प्रभाकर देशमुख. व्यासपीठावर शैला गोडसे व अन्य पदाधिकारी.