जयहिंद शुगर्सकडून अडचणीच्या काळात बिलांची पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:09+5:302021-09-05T04:27:09+5:30
चपळगाव : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सने अनेक अडचणींवर मात करीत गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला एफआरपीनुसार ऊस ...
चपळगाव : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सने अनेक अडचणींवर मात करीत गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला एफआरपीनुसार ऊस बिल, तोडणी बिल, वाहतूक बिल व कारखाना कामगारांचे वेतन अदा केल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली.
साखर कारखानदारांपुढे अनेक अडचणी उभ्या आहेत. यामध्ये सरकारचे साखर निर्यातीचे धोरण, साखरेचे पडलेले दर, वेळेवर बँकांकडून आर्थिक पुरवठा होत नसल्याने, उत्पादन खर्च व विक्री दरात तफावत, सरकारने साखर दर नियंत्रणमुक्त केल्याने आणि कारखान्यावरील कर्जाचे डोंगर वाढले असतानाही अडचणींवर मात करीत जयहिंद शुगरकडून सर्व बिल अदा करण्यात आले.
चेअरमन गणेश माने देशमुख, मुख्य व्यवस्थापक बब्रुवान माने देशमुख व व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. गतवर्षीच्या उसाला जयहिंद शुगरकडून एफआरपीनुसार २०५७ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. आज सरासरी २१०० रुपये प्रतिटन दर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
030921\5513fb_img_1624340252965.jpg
जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांचा फोटो