देयके भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित, महावितरणचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:12 PM2017-10-25T15:12:40+5:302017-10-25T15:13:36+5:30
सोलापूर दि २५ : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ६१ हजार ५६० वीजग्राहकांकडे ३८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात २ लाख ३४ हजार ६७६ घरगुती ग्राहकांकडे २८ कोटी ७३ लाख, वाणिज्यिक २३ हजार ६०७ ग्राहकांकडे ७ कोटी ६४ लाख तर ३ हजार २७७ औद्योगिक ग्राहकांकडे २ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ५०० कृषिपंपधारकांकडे वीजबिलांची २ हजार ३६२ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनाही वीजबिल भरण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील १ हजार ७३८ वीजग्राहकांकडे ३४ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे.
जिल्ह्यात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागत आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाºयांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे 'आॅनलाईन' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.