एका दिवसात महावितरणच्या तिजोरीत 10 कोटी रुपयांचा भरणा
By admin | Published: November 12, 2016 06:42 PM2016-11-12T18:42:02+5:302016-11-12T18:42:02+5:30
बारामती परिमंडलातील वीजग्राहकांनी ९ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १२ - वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी दिलेल्या मुदतीतील एका दिवसात बारामती परिमंडलातील वीजग्राहकांनी ९ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला.
सोलापूर मंडलात ५ कोटी ७३ लाख व सातारा मंडलात २ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला. बारामती ग्रामीण मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील वीजग्राहकांनी १ कोटी ९८ लाख रुपयांचा वीजबिलांपोटी भरणा केला. तर सायंकाळी उशिरापर्यंत वीजबिल भरणा केंद्रांवर बिल भरण्यासाठी ग्राहकांचा ओघ सुरू होता.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी दिवसभरात अनेक वीजबिल भरणा केंद्रांना भेटी देऊन वीजग्राहकांसाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. सोबतच सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील वीजबिल भरणा केंद्रांना भेटी दिल्या. वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बारामती परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच वीजबिल भरणा केंद्रे सुरू झाल्यानंतर वीजग्राहकांचा ओघ वाढत गेला. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता येईल यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह सर्वच केंद्रांवर महावितरणच्या कर्मचाºयांची अतिरिक्त स्वरुपात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देत होते व त्यासाठी सहकार्य करीत होते. तसेच जुन्या नोटा स्वीकारण्यासाठीचे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले. शनिवारीही बिल भरण्यासाठी भरणा केंद्रांवर वीजग्राहकांचा ओघ सुरूच होता.