भरधाव कंटेनर धडकेत अरणजवळ पादचारी ठार
By रवींद्र देशमुख | Updated: June 27, 2024 16:59 IST2024-06-27T16:58:34+5:302024-06-27T16:59:59+5:30
अंकुश नारायण क्षीरसागर (वय ६५, रा. अरण, ता. माढा) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.

भरधाव कंटेनर धडकेत अरणजवळ पादचारी ठार
सोलापूर :सोलापूर-पुणे महामार्गावर अरण (ता. माढा) गावाजवळ शेतातून पायी निघालेल्या वृद्धाला भरधाव कंटेनरने पाठीमागून ठोकरल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अंकुश नारायण क्षीरसागर (वय ६५, रा. अरण, ता. माढा) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. २७ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर अरण गावाजवळ एका पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला.
अपघातातील कंटेनर (एम. एच. ०४ / एलक्यू १८९७) हा सोलापूरहून पुण्याकडे निघालेला होता. अंकुश क्षीरसागर यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. जखमीस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. प्रशांत करंजकर आणि चालक सागर फाटे यांच्यासोबत गस्तिपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाला.