जीपच्या धडकेत पादचारी ठार; चालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:43+5:302021-02-07T04:20:43+5:30

जाताना त्याने (एमएच २२ पी ०००५) हे त्याच्या ताब्यातील वाहन धानोरे या गावाजवळ सोडून दिले. याबाबत मयताचा मुलगा प्रकाश ...

Pedestrian killed in jeep collision; The driver is absconding | जीपच्या धडकेत पादचारी ठार; चालक फरार

जीपच्या धडकेत पादचारी ठार; चालक फरार

Next

जाताना त्याने (एमएच २२ पी ०००५) हे त्याच्या ताब्यातील वाहन धानोरे या गावाजवळ सोडून दिले.

याबाबत मयताचा मुलगा प्रकाश रामलिंग अडसूळ यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. वाहन चालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादीच्या घरी दुभती जनावरे असल्याने मयत रामलिंग शेतकरी किरण आवटे यांच्या शेतातील उसाचे वाढे खरेदी करून आणण्यासाठी ते निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या जीपचालकाने अडसूळ यांना जबर धडक दिल्याने ते रोडवर पडले. चालक वाहनासह पळून गेला. दरम्यान, हा अपघात होताच त्याचा फिर्यादी मुलगा प्रकाश यांनी तातडीने नातलगांना बोलावून बार्शी येथील दवाखान्यात नेले. तेथे तपासणी करून ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना बेवारस वाहनाची माहिती मिळताच त्यांनी ते ताब्यात घेतले आहे.

---

Web Title: Pedestrian killed in jeep collision; The driver is absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.