बार्शीत पादचारी शिक्षिकेस अडवून दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:12+5:302021-03-15T04:21:12+5:30

बार्शी : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानाजवळ घराकडे निघालेल्या पादचारी शिक्षिकेस दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन, ...

The pedestrian teacher was stopped in Barshi and her jewelery was looted | बार्शीत पादचारी शिक्षिकेस अडवून दागिने लुटले

बार्शीत पादचारी शिक्षिकेस अडवून दागिने लुटले

Next

बार्शी : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानाजवळ घराकडे निघालेल्या पादचारी शिक्षिकेस दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन, मोबाईल काही रोखड असा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला.

शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून याबाबत प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मनीषा सुजित गाढवे (४३, रा. कासारवाडी रोड, बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, रोख दीड हजार रुपये, मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मनीषा या त्यादिवशी कुर्डुवाडी रोडवरील अध्यापक कॉलनी येथील भाडेकरूंना भेटून चालत कासारवाडी रोडवरून स्वत:च्या घराकडे पायी निघालेल्या होत्या. इतक्यात दुचाकीवरून दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी महिलेच्या समोर येऊन अचानक गाडी थांबविली. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन, दागिने पर्समधील पैसे व मोबाईल घेऊन पसार झाले. जाता-जाता फोनही पळविला. घरी परतल्यानंतर मनीषा यांनी कऱ्हाड येथे राहात असलेल्या पतीशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविली.

Web Title: The pedestrian teacher was stopped in Barshi and her jewelery was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.