दंड माफ होणार नाही पण सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:48 PM2020-06-29T15:48:10+5:302020-06-29T15:52:33+5:30

त्या अर्जाची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल; नियम सर्वाना सारखाच राहणार; कोरोनाची साखळी सोडण्यासाठी फिजिकल डिस्टन्स आवश्यकच

Penalties will not be waived but we will take a decision based on the real situation: Commissioner of Police | दंड माफ होणार नाही पण सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पोलीस आयुक्त

दंड माफ होणार नाही पण सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पोलीस आयुक्त

Next
ठळक मुद्दे- पत्नीला रूग्णालयात सोडण्यासाठी डबलसीटची परवानगी देण्याच्या मागणीसाठी अर्ज- त्या अर्जाची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली दखल- शहरातील दुचाकीस्वारांवरील कारवाईचे सत्र सुरूच

सोलापूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शहरांमध्ये मोटरसायकलवरून डबलसीट फिरण्यास परवानगी नाही. एकाला एक आणि दुसºयाला एक असा नियम करता येणार नाही. डबल सीटला परवानगी दिली जाणार नाही. नियमाने डबलसीट फिरणाºयांना  दंड केला जाणार आहे. पत्नीला सोडण्यासाठी पतीने डबल शीटच्या परवानगीसाठी अर्ज केला असेल, मात्र तशी ती देता येत नसल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी नियमाचे पालन करावे सॅनिटाईझर, मास्क वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे. पती-पत्नी असो किंवा अन्य कोणालाही डबल सीटची परवानगी देता येणारच नाही. पतीने पत्नीला सोडण्यासाठी जात असताना नाका बंदी दरम्यान कारवाई झाली असावी. याची सत्यता पडताळून पाहिली जाईल, त्या नंतर दंड करायचा की नाही यावर निर्णय होईल. असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

दोन वेळा दंड झालेल्या पतीने केला होता अर्ज
- बसवराज  मुसके यांची पत्नी एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. पत्नीला दररोज सोडण्यासाठी व आणण्यासाठी बसवराज मुसके यांना जावे लागते.  दरम्यान आता येथे त्यांच्यावर दोन वेळा डबल शीट जात असल्याच्या कारणावरून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंड केला होता. याला कंटाळून बसवराज मुसके यांनी पोलीस आयुक्तालयात पत्नीला सोडण्यासाठी डबल सीटची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आयुक्तालयामध्ये त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही शिवाय त्यांना आॅनलाइन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
 

Web Title: Penalties will not be waived but we will take a decision based on the real situation: Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.