आषाढी वारी विशेष; चेन्नईतील युवकांना पांडुरंगाचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:06 PM2019-07-10T13:06:27+5:302019-07-10T13:09:58+5:30

सात वर्षांपासून पंढरपुराची आषाढी वारी; स्वीकार, तडजोड अन् शिस्त शिकवते वारी

The people of Chennai take the Panduranga | आषाढी वारी विशेष; चेन्नईतील युवकांना पांडुरंगाचा लळा

आषाढी वारी विशेष; चेन्नईतील युवकांना पांडुरंगाचा लळा

Next
ठळक मुद्दे वारी अन् वारीचं माहात्म्य आता सातासमुद्रापार पोहचलंयदेश-विदेशातील लोकांनाही वारीनं भुरळ पाडली आहेयंदाच्या वारीत चेन्नईच्या सहा तरुणाईची टीम संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात

शहाजी फुरडे-पाटील

पिराची कुरोेली : वारी अन् वारीचं माहात्म्य आता सातासमुद्रापार पोहचलंय. देश-विदेशातील लोकांनाही वारीनं भुरळ पाडली आहे. यंदाच्या वारीत चेन्नईच्या सहा तरुणाईची टीम संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भेटली. यामध्ये तीन उच्चशिक्षित तरुणींचा समावेश आहे. या वारीमुळे जसे आहे तसे कसे राहावे व स्वीकारावे हे शिकविले, नियम कसे पाळावेत याचा तर वारी म्हणजे मापदंडच आहे. अ‍ॅक्सेप्टन्स.. कॉम्प्रमाईज आणि डिसीप्लीन हे तीन मंत्र वारीने दिल्याचं या युवकांनी लोकमतशी बोलताना आवर्जून सांगितलं. 
तामिळनाडू येथील तुकाराम गणपती हे भागवत धर्माची पताका तिकडे फडकवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे युवक वारीत आले आहेत. सदानंद मोरे यांच्यासोबत गणपती मूर्ती यांनी गाथा अध्ययन केले. त्यात ते एवढे एकरुप व तुकाराममय झाले की, तामिळनाडूमध्ये त्यांचे नाव तुकाराम गणपती असेच पडले. 

भक्ती, सेवा आणि निष्ठा याचा प्रचार करण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्रातील संत घराणी देहूकर मोरे, पंढरीचे नामदास, पैठणचे गोसावी, बाबा महाराज सातारकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देहूकर पुंडलिक मोरे महाराज यांच्याकडेही ते अधूनमधून मार्गदर्शन घेत असतात.
--------
मराठी भजने आत्मसात
हे पाच युवक बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीत गेल्या सात वर्षांपासून सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे ते मराठी भजने गातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवन कसे जगावे हेच वारी शिकवते. आम्ही वारीत चालत असताना साक्षात महाराज आमच्याबरोबर चालतात असा अनुभव येत असल्याचे अनुप्रिया आवर्जून सांगते. संत ज्ञानेश्वर महाराज हे विश्वमाऊली तर तुकाराम महाराज हे विश्वपिता आहेत असे हे म्हणतात.
--------
आजन्म वारी करणार!
- हरीप्रिया, रूमला, गुरुराज, रोहित, अपर्णा आणि संजीवी अशी या तरुणाईची नावे आहेत. सीए, इंजिनिअरिंग, एमक़ॉम, बी़ए़ पदवीधर आणि वेद पंडित असे हे सर्व उच्चशिक्षित आहेत. आम्ही आजन्म वारी करणार हे सांगायला ते विसरले नाहीत. माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले मग आम्ही तर कोणत्या का प्रांतातील असेना माणसे आहोत, असे गुरुराज म्हणाला. 

Web Title: The people of Chennai take the Panduranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.