पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील; आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:51 PM2018-10-11T12:51:50+5:302018-10-11T12:55:05+5:30

अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठक

People do not kill water if they do not get water; MLA Siddaram Mhetre expressed fear | पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील; आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली भिती

पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील; आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली भिती

Next
ठळक मुद्देप्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावीअक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरूदुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. दुष्काळीप्रसंगी पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील अशी भीती आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

 अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठकीत म्हेत्रे बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पंचायत समिती सभापती सुरेखा काटगाव, गटविकास अधिकारी कोळी, उपसभापती प्रकाश हिप्परगी, महादेव बेळ्ळे, राजेंद्र बंदीछोडे, के. पी. पिरजादे, गुंडप्पा पोमाजी,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे, प्रदीप जगताप, प्रदीप पाटील,अरुण जाधव,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे,तलाठी संघटना अध्यक्ष ए पी पाटील,  नूरधीन मुजावर, रमेश भासगी, निगप्पा कोळी यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

प्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावी. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने कामाला लागावे. राजकारण बाजूला सारून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले.
उपाध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले, नाविंदगी, नागणसूर, शावळ, गौडगाव (बु.) या गावांनी वीज बिल न भरल्यामुळे शावळ येथे असलेले पंपहाऊस बंद आहे. पन्नास टक्के बिल जिल्हा परिषद भरण्यास तयार आहे, त्याचा प्रस्ताव द्यावा. सोलारवर हातपंपमधून पाणी उपसा वीज बिल भरावे लागणार नाही, त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी दुष्काळामुळे घाबरून न जाता नामी संधी समजून प्रत्येक गावातील विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, सरळीकरण यासारखी कामे करावीत, असे आवाहन केले.

टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा
- गळोरगी, भोसगे, बोरेगाव, चपळगाववाडी, बावकरवाडी, शेगाव, गोगाव,उमरगे या गावांत पाणीटंचाई भासणार नसल्याचे संबंधितांनी सांगितले. हिळ्ळीत पाणी मुबलक असले तरी ते पिण्यालायक नाही. हालहळ्ळी (ह.)येथील कोणीच उपस्थित नव्हते. हातपंप दुरुस्तीसाठी कर्मचारी नाहीत, ते मानधनावर घ्यावेत, असे ठरले. एबीसीडी या कोडवर्डबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांना सांगता आले नाही. ५०० फुटांच्या आत असणाºया विहीर, बोअरमधून विनामानधन पाणी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा, असे तहसीलदार म्हणाल्या. सर्वच गावांत डिसेंबरअखेर पाणीटंचाई भासणार असल्याचे सांगण्यात आले.

म्हेत्रे भडकले
- बैठक चालू असताना काही कर्मचारी गप्पा मारण्यात,मोबाईल चॅटिंग करण्यात मग्न होते. तेव्हा भडकलेले म्हेत्रे म्हणाले, तुम्हाला शिस्त नाही. आम्ही काय वेळ काढून गोट्या खेळायला बसलो आहे काय? गावात दाखवण्यासाठी पदाधिकारी होता का? अशा शब्दात म्हेत्रे यांनी खडसावले. 

Web Title: People do not kill water if they do not get water; MLA Siddaram Mhetre expressed fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.