जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:30 PM2023-02-14T15:30:51+5:302023-02-14T15:35:08+5:30

मिशन महाविजय संयोजकपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय हे मंगळवारी  सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

People trust Pawar or Fadnavis Once the survey is done, let it go says Srikanth Bharatiya | जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय

जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय

googlenewsNext

विठ्ठल खेळगी -

सोलापूर : महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेचा विश्वास पवारांवर आहे की फडणवीसांच्या शब्दावर आहे, याबाबत एकदा सर्व्हे  होऊनच द्या. कळेल की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे? असे आव्हान भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले आहे. पवारांवर त्यांच्या घरातील लोकांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मिशन महाविजय संयोजकपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय हे मंगळवारी  सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, देशातील जनतेचा विश्वास आजही नरेंद्र मोदी यांच्या कामावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून भाजप शिवसेना युतीच्या हातात सत्ता दिली होती. त्यानंतर खरी गद्दारी झाली होती. आजची युती ही नैसर्गिक युती आहे. खरी गद्दारी कोणी केली हे जनतेला माहित आहे.




येणाऱ्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यात्यावेळीची परिस्थिती पाहून उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मतदारसंघातील नेत्यांच्या कामांची माहिती घेतली जाते. भाजपच्या कॅटेगिरीत बसणाऱ्या उमेदवाराला संधी मिळते, असेही ते म्हणाले.
 

Web Title: People trust Pawar or Fadnavis Once the survey is done, let it go says Srikanth Bharatiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.