प्रशासनाची कामगिरी पडली भारी; कोरोना महामारी आली आरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:09+5:302021-06-22T04:16:09+5:30

कोरोनाबाधितांना आरोग्य सुविधा पुरविताना कमतरता भासू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवाय ग्रामीण भागात शक्य असेल तेथे कोविड केअर ...

The performance of the administration fell heavily; Corona epidemic occurred | प्रशासनाची कामगिरी पडली भारी; कोरोना महामारी आली आरी

प्रशासनाची कामगिरी पडली भारी; कोरोना महामारी आली आरी

Next

कोरोनाबाधितांना आरोग्य सुविधा पुरविताना कमतरता भासू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवाय ग्रामीण भागात शक्य असेल तेथे कोविड केअर सेंटर उभा करून त्या त्या भागात रुग्णांची सोय केल्याने नागरिक कोरोना तपासणीसाठी तयार झाले. त्यामुळे साखळी तुटण्यास मदत झाली. पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत २५ हजार २२५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यामधील २४ हजार ३२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ४८७ व्यक्तींचा बळी गेला आहे, तर ४१५ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट सुरू होतानाच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू होती. दरम्यानच्या कालावधीत प्रचारसभांना होत असलेली गर्दी यामुळे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडताच तालुक्यात प्रथम क्रमांकावर गेलेली कोरोनाबाधितांची संख्या प्रशासनाचे योग्य नियोजन आणि खबरदारीमुळे संख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरले.

आक्रमक कामगिरीनेच कोरोना आटोक्यात

पंढरपूर तीर्थक्षेत्र असून याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे नागरिकांची आवकजावक जास्त असते. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीमुळे रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी पोलीस प्रशासन, महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून कोरोना समित्या, स्वयंसेवी संस्था, शिक्षक आणि आरोग्य सेवकांनी पाठबळ देण्याचे काम केले. तालुक्यात ३० आयसोलेशन सेंटर, २० कोविड रुग्णालयांच्या माध्यमातून एक हजार, तर ६ कोविड सेंटरच्या माध्यमातून एक हजार बेड निर्माण केले. लहान मुलांसाठी ३ रुग्णालये उपलब्ध केली. यातून रुग्णांना सोयी-सुविधा देण्याबाबत सर्व टीम सतर्क राहिली. यामुळे आज रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी नागरिकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Web Title: The performance of the administration fell heavily; Corona epidemic occurred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.