सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:18 PM2020-12-04T13:18:24+5:302020-12-04T13:18:27+5:30

पोलिसांनी डॉक्टर, शिक्षक आणि सहायकचे वेशांतर करून पकडले आरोपीला

Performance of CID police; Corona caught as fugitive accused | सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

Next

सोलापूर : अकरा वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी डॉक्टर, शिक्षक आणि सहायकचे वेशांतर करून पकडले. जेवर हरीशचंद्र काळे (वय ४२, रा. नरखेड, मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नरखेड येथे ही कारवाई केली.

२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता; पण तो गुरुवारी दुपारी नरखेड येथे आल्याची माहिती सीआयडीला मिळाली. यावरून पोलीस नरखेड येथे गेल्यानंतर आरोपी तेथे असल्याची खात्री पटली. आरोपीला संशय आल्यास तो तेथून पळून जाईल म्हणून पोलिसांनी वेशांतर केले आणि एक पोलीस डॉक्टर, दुसरा शिक्षक आणि तिसरा सहायक झालेल्या तिघांनी मिळून नरखेड गावातील काही लोकांची तपासणी करत त्यांच्या घराजवळ गेले. त्यांच्या घरातील लोकांची तपासणी केली. जेव्हा आरोपी जेवर हा समोर आल्यानंतर त्याची खात्री करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याचे सांगितले. त्याला नरखेड येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर त्याची अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यास सांगितले. दरम्यान, सीआयडींनी मोहोळच्या पोलिसांना खबर दिली़ पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. ही कामगिरी सीआयडीचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, हवालदार शिवाजी अंकलगीकर, हाजीमलंग शेख यांनी केली.

...आणि त्याने हत्यार काढून ठेवले

जेव्हा पोलिसांनी आरोपी जेवर काळे याचे पोलिसांनी तापमान आणि पल्स तपासणी करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याबाबतचे सांगून हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी येण्यास सांगितले़, तेव्हा आरोपीने आपल्या कंबरेला बांधलेले धारधार हत्यार घरीच काढून ठेवले़ त्यानंतर तो पोलिसांच्या सोबत हॉस्पिटलकडे आला. त्यामुळे त्याला सहजपणे पकडता आले.

Web Title: Performance of CID police; Corona caught as fugitive accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.