कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच दुकान उघडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:10+5:302021-03-28T04:21:10+5:30

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ...

Permission to open a shop only if there is a covid negative certificate | कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच दुकान उघडण्याची परवानगी

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच दुकान उघडण्याची परवानगी

Next

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून कठोर पाऊल उचलून शहरातील सर्व खासगी आस्थापनाधारकांसह कर्मचाऱ्यांची २७ ते ३१ मार्च या कालावधीत कोरोना चाचणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल त्यालाच दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे.

नगरपालिका, तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकामार्फत दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्या दुकानदारांकडे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशा दुकानदारांवर कारवाई करून दुकान ३० दिवस सील केले जाईल, असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

दोन दिवस रस्त्यांवर शुकशुकाट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार सलग दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना, दुकाने व्यवहार बंद ठेवले. यामुळे सांगोला शहरातील बाजारपेठ व प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य पडले होते. त्याचीच पुनरावृत्ती होईल की काय? अशीच नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

फोटो ओळ ::::::::::::::::::

सांगोला शहरातील जय भवानी चौकात शनिवारी बाजारपेठेसह रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे छायाचित्र.

Web Title: Permission to open a shop only if there is a covid negative certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.