टेंभुर्णीच्या परमिट रूम, बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:11+5:302021-06-10T04:16:11+5:30
अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी येथील औदुंबर भागवत यांनी परमिट रूम व बीअर बारचे लायसन्स मिळवण्यासाठी सादर केलेला ...
अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी येथील औदुंबर भागवत यांनी परमिट रूम व बीअर बारचे लायसन्स मिळवण्यासाठी सादर केलेला ग्रामसभा ठराव, ग्राम पंचायत ना हरकत दाखला, बांधकाम परवाना व गावठाण हद्दीचा दाखला आदी कागदपत्रे स्वतः तयार केलेले शिक्के मारून स्वतः सह्या करून लायसन्स मिळवले आहे. या प्रकरणी जयवंत पोळ यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल मागवला होता. त्यांनी २३ जानेवारी २०२० व २७ जुलै २०२० असा दोन वेळा पडताळणी करून अहवाल पाठवला. यामध्ये कागदपत्रे दप्तरी नोंद असल्याचा अहवाल पाठवला होता. पोळ यांनी या अहवालास आक्षेप घेऊन ५ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा तक्रार करून दोन्ही अहवाल चुकीचे असून, संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
पोळ यांनी १५ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा एक तक्रारी अर्ज केला. त्याद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांनी २१ सप्टेंबर २०२० व २० जानेवारी २१ रोजी याप्रकरणातील बांधकाम परवाना ३० नोव्हेंबर २०११ या कागदपत्रावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरी बनावट आहेत. बांधकाम परवाना बोगस आहे, असा अहवाल दिला.
शेवटी गटविकास अधिकारी यांचा पडताळणी अहवाल, जयवंत पोळ यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारी व भागवत यांचे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अखेर औदुंबर भागवत यांच्या हॉटेल साई पॅलेसच्या परमिट रूम व बीअर बारचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले आहे.
---
फौजदारी गुन्ह्याची करणार मागणी
खोटी कागदपत्रे जोडून व खोट्या सह्या करून परमिट रूम व बीअर बारचे लायसन्स मिळून फसवणूक केल्याबद्दल औदुंबर भागवत यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे जयवंत पोळ यांनी सांगितले.