विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या बहुराज्यीय संस्था नोंदणी आदेशाविरुद्ध याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:19+5:302021-02-13T04:22:19+5:30
विठ्ठलराव शिंदे कारखान्याची बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा २००२ नुसार केंद्रीय निबंधक सहकारी संस्था नवी दिल्ली यांच्याकडील ...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याची बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा २००२ नुसार केंद्रीय निबंधक सहकारी संस्था नवी दिल्ली यांच्याकडील आदेश क्रमांक एल-११०६/२५/२०११ -एल ॲण्ड एम अन्वये बहुराज्य सहकारी संस्थेत नोंदणी केली. या आदेशाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, आदिनाथ परबत, बापू गायकवाड, भगवान मुकणे, शारदा पाटील यांनी मुंबई हायकोर्टात रिटपिटीशनद्वारे आव्हान याचिका दाखल केली. या आव्हान याचिकेची सूनावणी १२ रोजी हायकोर्ट न्यायाधीश आर. डी. धनुका व न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या कोर्टापुढे झाली. यामध्ये प्रतिवादींना ९ मार्च रोजी हायकोर्टात हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. ॲड. धनंजय चव्हाण यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली. केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्याकडे महाराष्ट्र शासनातर्फे व कारखान्याकडून कारखाना बहुराज्यीय करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवून सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी बहुराज्यीय सहकारी संस्थेमध्ये केली आहे. केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या ५ नोव्हेंबर २०२० च्या आदेशाविरुद्ध आव्हान याचिका दाखल केल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले.