फोटोग्राफीनं केलं कुटुंबीयांचं जीवन सुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:23+5:302020-12-05T04:43:23+5:30
बबन यांना वयाच्या सहाव्या वर्षी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांना अपंगत्व आले. गावी ‘ना शेती, ना घर’ अशी अवस्था. आई-वडील ...
बबन यांना वयाच्या सहाव्या वर्षी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांना अपंगत्व आले. गावी ‘ना शेती, ना घर’ अशी अवस्था. आई-वडील मिळेल ती मोलमजुरी करून प्रपंच करीत. त्यात आपण अपंग आहोत, याची तमा न बाळगता त्यावर मात करण्याची जिद्द बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या तारगाव स्टेशन (ता. कोरेगाव) येथे दहावीपर्यंत शिक्षण घेऊन ‘स्वावलंबी शिक्षण’ हेच ब्रीद काळजावर कोरून स्वावलंबी शिक्षण जगण्याचा निश्चय केला.
करमाळ्यातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या आवारात उघड्यावर पाल ठोकून राहिलो. वडील गावात चार घरे मागून आणलेली भाकरी मला दूध वाहतुकीच्या टेम्पोत पाठवत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. करमाळा शहरातील बाळासाहेब कुंभार या फोटोग्राफरने माझी परिस्थिती पाहून फोटो स्टुडिओत मला कामाला ठेवून राहण्याची व खाण्याची सोय केली. मी अपंग असूनही त्यावर मात करून फोटोग्राफी शिकलो आणि स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू केला. अपंगांची दु:खं काय असतात, हे माहीत असल्याने अपंग संघटनेच्या माध्यमातून अपंगांना मदत करण्याचे काम करीत आहे.
०२करमाळा-अपंग