लग्न मोडावे म्हणून तरुणीच्या मोबाईलवर पाठवले फोटो अन् चॅटिंगचे स्क्रीनशॉट; पीडितेची पोलीस ठाण्यात धाव
By विलास जळकोटकर | Published: February 16, 2024 07:29 PM2024-02-16T19:29:39+5:302024-02-16T19:29:42+5:30
हा प्रकार २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर: ठरलेले लग्न मोडण्यासाठी पाठलाग करुन व्हॉटसअपवर फोटो आणि चॅटिंग पाठवणाऱ्या अनोळखी मोबाईधारकाविरुद्ध तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहरातील एका नगरामध्ये २५ वर्षीय तरुणी आपल्या नातलगांसमवेत राहते. तिचे पर जिल्ह्यातील एका तरुणाशी लग्न जमले आहे.
ते लग्न होऊ नये मोडावे म्हणून ८३६९६३१८५७ या मोबाईलधारकाने आपली ओळख लपवून पिडित तरुणीच्या मोबाईलवर व्हॉटस्अपद्वारे फोटो आणि चॅटिंगचे स्क्रीन शॉट पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबद्दल पिडितेने आपल्या नातलगाशी बोलून याचा सोक्षमोक्ष व्हावा म्हणून विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून रितसर फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस शोध घेत आहेत.