२० वी महाराष्ट्र राज्य बालनाटय स्पर्धेत सोलापूर केंद्रातून “फुलवा मधुर बहार” प्रथम
By शीतलकुमार कांबळे | Published: January 19, 2024 07:47 PM2024-01-19T19:47:20+5:302024-01-19T19:47:42+5:30
दोन नाटकं पुढील फेरीसाठी पात्र
सोलापूर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून रंगसंवाद प्रतिष्ठान, जुळे सोलापूर या संस्थेच्या फुलवा मधुर बहार या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तसेच संकल्प युथ फाऊंडेशन या संस्थेच्या काश्मिर स्माईल या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.
या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२४ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सारिका पेंडसे, किरणसिंह चव्हाण आणि गणेश शिंदे यांनी काम पाहिले.