कचऱ्याचा साचतो ढीग... नाही कोणाचे लक्ष डेंग्यू, मलेरियाने डोके काढले वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:14+5:302021-09-19T04:23:14+5:30
त्यातच कमी की काय म्हणून या कचऱ्यावर शहरातील मोकाट फिरणारी जनावरेही त्याचा आस्वाद घेण्यासाठी दिवसभर थांबून असतात. त्याचाही अडथळा ...
त्यातच कमी की काय म्हणून या कचऱ्यावर शहरातील मोकाट फिरणारी जनावरेही त्याचा आस्वाद घेण्यासाठी दिवसभर थांबून असतात. त्याचाही अडथळा जवळच्या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना होत आहे.
कुर्डूवाडी शहरामध्ये कचरा वेळच्या वेळी न उचलला गेल्यामुळे डास व माशांचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध भागांतील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर येथील आठवडे बाजार, भाजीपाला मार्केट, मासे मार्केटजवळही अतिशय घाण साचलेली आहे. येथे जवळच बसलेले विक्रेतेही खराब झालेला माल सायंकाळी घरी जाताना टाकून देतात. त्यामुळेही येथे मोकाट जनावरांचीही गर्दी जास्त आढळून येते.
----
डेंग्यू, मलेरिया, टायफाॅइडला आमंत्रण
विक्रेते व नगर परिषद सडलेला भाजीपाला व माशांच्या घाणीची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कायमच घाण वास येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. थोडाजरी पाऊस झालातरी या परिसरात घाणीची दुर्गंधी पसरते. सध्या कुर्डूवाडी शहरात चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, टायफाॅइड यासारखे साथीचे आजार बळावत आहेत. प्रशासनाला याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून आहे.
-----
भाजीमंडईतला कचरा रोजच्या रोज सायंकाळी घंटागाडी लावून भरला जात असतो. शहरातील रस्त्यावर खाली कचरा दिसणार नाही. येथून पुढे जो कोणी कचरा खाली रस्त्यावर टाकेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
-तुकाराम पायगण, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, कुर्डूवाडी
------