दारू सोडलेल्यांची पिंपळवाडी ग्रामपंचायतीने थोपटली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:15+5:302021-08-20T04:27:15+5:30
कुसळंब : काही वर्षांपूर्वी दारू पिणारे आणि आता व्यसनमुक्त झालेल्या २० जणांची पिंपळवाडी (ता. बार्शी) ग्रामपंचायत व आयुष ...
कुसळंब : काही वर्षांपूर्वी दारू पिणारे आणि आता व्यसनमुक्त झालेल्या २० जणांची पिंपळवाडी (ता. बार्शी) ग्रामपंचायत व आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शाल, श्रीफळ देऊन पाठ थोपटली.
यावेळी सरपंच जयश्री रमेश चौधरी व आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत वर्षभरात वीस नागरिकांनी दारू सोडली आहे. त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. संदीप तांबारे, सरपंच जयश्री चौधरी, व्यसनमुक्तीचे मार्गदर्शक देवा चव्हाण, दीपक शेळवणे, रोहित गोरे, रमेश चौधरी, उपसरपंच गोवर्धन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आजमुद्दीन मुलाणी, पूजा चौधरी, रेश्मा चौधरी, रोहित चौधरी, सुतार ताई, श्रीमंत गुरुजी, बाळू सावकार, चिऊ पाटील, गोर्धन माने, दत्ता पाटील, अनुबा डांगे, बुबासाहेब डांगे, डिगू नाना, शैला चौधरी वंजिता, जयश्री चौधरी, सोनाली गर्जे, विद्या चौधरी उपस्तिथ होते.
-----------
अखेर महिलांनीच कंबर कसली अन् दारू बंद झाली
यावेळी सरपंच जयश्री चौधरी यांनी काही वर्षांपासून पिंपळवाडीत दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे दिली. सोळा-सतरा वर्षांची मुले दारू पिऊ लागली. अनेक महिलांना तरुणपणातच आपल्या जोडीदाराला गमवावे लागले. यामुळे अनेक बचत गटाच्या महिलांनी प्रयत्न करूनही दारू बंद झाली नाही. आता महिलांनीच कंबर कसली अन् गावातील दारू बंद झाली. आता जो कोणी मद्यपान करून येईल त्याला धडा शिकवू व व्यसनमुक्ती केंद्रात पाठवू, असा मनोदय यावेळी उपस्थतीत महिलांनी व्यक्त केला.