तुरीचा मालट्रक पळविणारी टोळी जेरबंद, २६२ पोत्यांसह १३ लाख ७४ हजार ७९६ चा मुद्देमाल जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:27 AM2018-01-06T09:27:49+5:302018-01-06T09:29:39+5:30
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूरदि ६ : मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली.
अशोक बबन निळे (व्हसपेठ, ता. जत, सांगली), पैगंबर सिकंदर शेख (वय २७, तासगाव फाटा, ता. मिरज, जिल्हा सांगली), संभाजी वसंत ननवरे (२४), दत्ता रायगोंडा बंडगर (वय २५, माडग्याळ, ता. जत, जिल्हा सांगली), दादासोा पडोळकर (रा. कुलाळवाडी, ता. जत, जिल्हा सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. नंदकुमार सयाजीराव शिंदे (रा. मळनगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.१० झेड-२३०४) मध्ये तुरीचे पोते घेऊन जत येथून सोलापूरकडे येत होते. ट्रक बेगमपूर येथे आला असता पाठीमागून बोलेरो जीपने मालट्रकला अडवले. नंदकुमार शिंदे यांना मारहाण करीत त्यांच्याजवळील ४ हजार ३०० रुपये रोख, मोबाईल हॅण्डसेट काढून घेतले व मालट्रक पळवून नेला. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष पथक अज्ञात गुन्हेगारांच्या मागावर असताना पो.नि. विजय कुंभार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपींनी व्हसपेठ, ता. जत, जि. सांगली येथील अशोक निळ व त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. त्याप्रमाणे पो.नि. कुंभार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे व कर्मचाºयांनी टोळीचा माग काढला. दि. २ जानेवारी रोजी आरोपी मंगळवेढा तालुक्यातील उमदी भागात असल्याची माहिती समजली. त्यानुसार हुलजंती फाटा येथे सापळा रचला असता संशयितांची जीप तेथे आली. त्यांना अडवून चौकशी केली असता मालट्रक पळवून नेल्याची कबुली दिली. या प्रकरणी अशोक बबन निळे, पैगंबर सिकंदर शेख, संभाजी वसंत ननवरे, दत्ता रायगोंडा बंडगर यांना अटक करण्यात आली आली व त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार २९६ रुपये किमतीच्या २१३ तुरीची पोती, ४ लाख रुपये किमतीची बोलेरो जीप व ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालट्रक व ५०० रुपये किमतीचे एअरगन असा एकूण १३ लाख ७४ हजार ७९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सपोनि बल्लाळ करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पोह. नारायण गोलेकर, गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप राऊत, पो.कॉ. सागर शिंदे, सचिन मागाडे, व्यंकटेश मोरे, मनीष पवार, इस्माईल शेख, दीपक जाधव यांनी केली.