एकता परिषदेच्या अध्यक्षपदी पिरजादे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:39+5:302021-01-18T04:20:39+5:30
माढा बार असोसिएशन अध्यक्षपदी भोसले माढा : माढा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. शिवराज श्रीधर भोसले यांची निवड करण्यात आली. ...
माढा बार असोसिएशन अध्यक्षपदी भोसले
माढा : माढा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. शिवराज श्रीधर भोसले यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. एस. एस. जगताप,ॲड. एन. के. तांबिले यांनी काम पाहिले. माढा बार असोसिएशनची २०२१ ची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. अध्यक्ष - ॲड. शिवराज श्रीधर भोसले, उपाध्यक्ष ॲड. गणेश सावंत, सचिव ॲड. भीमराव लंकेश्वर, सहसचिव ॲड. पुरुषोत्तम क्षीरसागर, ग्रंथालय सचिव ॲड. परशुराम शिंदे, ग्रंथालय सहसचिव ॲड. ज्ञानेश्वर लोंढे, खजिनदार ॲड. नागेश शेळके हे पदाधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत.
--- फोटो :१७ शिवराज भोसले
गणपतराव साठे यांची जयंती साजरी
माढा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात सहकारमहर्षी स्व. गणपतराव साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य प्रा. अशोक कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डी.व्ही. चवरे, माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे यांनी कै. गणपतराव साठे यांच्या सहकार चळवळीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे व पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. संदीप साठे, नवनाथ लवटे, प्रा. आशोक लोंढे, शंभुराजे साठे, मुख्याध्यापक विजय साठे, हनुमंत परबत , अशोक चोपडे, डॉ. सुशील शिंदे, राऊत उपस्थित होते.