कृषिभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपींकडून पिस्तूल, दोन तलवारी जप्त

By काशिनाथ वाघमारे | Published: March 9, 2024 05:34 PM2024-03-09T17:34:13+5:302024-03-09T17:34:30+5:30

सोलापूर : कृषिभूषण अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी मंगळवेढा ...

Pistol, two swords seized from the accused in Krishibhushan Ankush Padwale beating case | कृषिभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपींकडून पिस्तूल, दोन तलवारी जप्त

कृषिभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपींकडून पिस्तूल, दोन तलवारी जप्त

सोलापूर : कृषिभूषण अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन तलवारी जप्त केल्या आहेत.

ही घटना ६ मार्च रोजी रात्री ८:३०च्या सुमारास जुनोनी शिवारात घडली होती. याप्रकरणी अंकुश शिवाजी इटकर, रवी शिवाजी इटकर, करण शंकर इटकर (सर्व रा. लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा), अतुल इटकर, सुमित जाधव, आकाश इटकर, (रा. सध्या पंढरपूर) व इतर ३ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे हे जुनोनी तलावातील गाळ (माती) काढून फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरिता घेऊन जात असताना आकाश इटकर, अंकुश इटकर, रवी इटकर, करण इटकर, अतुल इटकर, सुमित जाधव व इतर तिघांनी दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेतल्या.

गाळ काढायचा नाही म्हणत हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आकाश किसन इटकर याने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून जीवच मारतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिस निरीक्षक रणजित माने हे पोलिस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तीन आरोपींकडून दोन तलवारीसह एक पिस्तूल जप्त करण्यात यश आले. इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, हवालदार हजरत पठाण, कॉन्स्टेबल राजू आवटे, सुरज देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Pistol, two swords seized from the accused in Krishibhushan Ankush Padwale beating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.