खड्ड्यांमुळे होतोय शरीराचा खिळखिळा अन‌् गाडीचा खुळखुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:02 AM2021-02-20T05:02:06+5:302021-02-20T05:02:06+5:30

भीमा नदीकाठचा भाग असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. ऊस हंगाम कालावधीत उसाच्या वाहतुकीसह शेतीसाठी लागणारे खत, इतर पिकांची ...

Pits cause body cramps and cramps | खड्ड्यांमुळे होतोय शरीराचा खिळखिळा अन‌् गाडीचा खुळखुळा

खड्ड्यांमुळे होतोय शरीराचा खिळखिळा अन‌् गाडीचा खुळखुळा

Next

भीमा नदीकाठचा भाग असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. ऊस हंगाम कालावधीत उसाच्या वाहतुकीसह शेतीसाठी लागणारे खत, इतर पिकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. भीमा, पांडुरंग, विठ्ठल, युटोपीयनसह इतर कारखान्यांकडे उसाची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. मात्र अनेक वर्षांपासून रस्त्यावर डांबरीकरण झाले नसल्याने खड्ड्यांची चाळण निर्माण झाली आहे.

तिऱ्हेमार्गे सोलापूर-पंढरपूर रस्ता हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व डाॅ. जयसिद्धेश्वर महास्वामी या दोन खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात, तर आमदार बबनराव शिंदे व आमदार यशवंत माने यांच्या विधानसभा मतदारसंघातून जाणारा मार्ग आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अनेकवेळा आश्वासने देऊनही रस्त्याचे नूतनीकरण अद्यापही झाले नाही.

दुरुस्तीच्या नावाखाली केवळ मलमपट्टी

प्रत्येकवर्षी तिऱ्हेमार्गे सोलापूर-पंढरपूर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र रस्ता दुरुस्तीचा ठेका घेऊन ठेकेदाराकडून रस्त्याची केवळ मलमपट्टी केली जात आहे. यामुळे शासनाची लाखो रुपयाची लूट केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत.

कोट :::::::::::::::

हा रस्ता नॅशनल हवे नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत आहे. तरीही एशियन बँकेकडून २०० कोटी रुपये कर्ज काढून पंढरपूर ते कुरुल-कामतीपर्यंत हा रस्ता मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- बबनराव शिंदे

आमदार, माढा विधानसभा

कोट :::::::::::::::::::::

या रस्त्याच्या मंजुरीसाठी एडीपीच्या हेडमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. थोड्याच दिवसात पंढरपूर ते कुरूल ३५ कि.मी. रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

- यशवंत माने

आमदार, मोहोळ विधानसभा

कोट ::::::::::::::::::::

तिऱ्हेमार्गे सोलापूर-पंढरपूर रस्त्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण झाला नाही. पंढरपूरकडे ये-जा करताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अंगाचा खिळखिळा अन‌् मणक्याचे व धुळीने श्वासनाचे आजार होऊ लागले आहेत. दोन खासदार आणि दोन आमदारांच्या मतदारसंघातील ३५ कि.मी. अंतराचा रस्ता नूतनीकरण होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

- अविनाश रणदिवे

प्रवासी, सुस्ते

फोटो लाईन :::::::::::::::::::

तिऱ्हेमार्गे सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर ठिकठिकाणी असे जीवघेणे खड्डे पडले आहेत.

Web Title: Pits cause body cramps and cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.