जिल्हाधिकारी कार्यालयात अंत्यसंस्काराचा इशारा देताच मिळाली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:39+5:302021-08-01T04:21:39+5:30
गावातील मुस्लीम समाजातील मृतदेहासाठी जागेची अनिवार्य गरज असताना दिलेल्या आश्वासनानुसार अद्यापही जागा मिळाली नाही त्यामुळे शेतात दफन करावे लागत ...
गावातील मुस्लीम समाजातील मृतदेहासाठी जागेची अनिवार्य गरज असताना दिलेल्या आश्वासनानुसार अद्यापही जागा मिळाली नाही त्यामुळे शेतात दफन करावे लागत होते. ज्यांना शेती नाही अशा कुटुंबासमोर अडचण निर्माण झाली होती.
याप्रसंगी पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण, तहसीलदार सुनील शेरखाने, पांगरी पोलीस स्टेशनचे सपोनि तोडरमल यांनी गावी येऊन यासाठी असलेली गावाजवळील बावी रोडजवळ असलेल्या गायरानातील स्मशानभूमीसाठी असलेल्या जागेचा तात्पुरता पंचनामा करून त्यांच्या ताब्यात देताच दफन करण्यात आले. याबाबत हारुन ताजुद्दीन शेख, आदम शेख, तुराब वजीर शेख, मुजाहिद महंमद शेख, ताजुद्दीन शेख, अकबर शेख यांनी तहसीलदार यांना भेटून निवेदन देऊन त्याच्या प्रति जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी पांगरी पोलिसांना निवेदन दिले होते.
----
तांदुळवाडी गावाची पाहणी तातडीने करून गट नं.१४ मधील जागा दफनभूमी व स्मशानभूमीसाठी शिल्लक असली तरी गावात मयत झालेल्याचे दफन करण्यासाठी दिली असून उर्वरित क्षेत्राची मोजणीच्या अधिन राहून व भूमिअभिलेख कार्यालयाकडून तातडीने मोजणी करून यासाठी हस्तांतरित केली जाईल -तहसीलदार सुनील शेरखाने ----