दसरा, दिवाळीचे नियोजन करा, सणांसाठी धावणार विशेष गाड्या
By रूपेश हेळवे | Published: September 29, 2023 07:07 PM2023-09-29T19:07:51+5:302023-09-29T19:08:22+5:30
या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
रूपेश हेळवे, सोलापूर : आगमी काळात दसरा, दिवळी यासारखे मोठे सण उत्सव आहेत. यासाठी बाहेर गावी जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे त्यांच्यासाठी मध्य रेल्वेकडून सहा गाड्यांना विशेष मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे नियाेजन रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. यात साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक, दादर-काझीपेठ साप्ताहिक या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छठ सणांच्या दरम्यान विशेष गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. यात साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी १६ ते २७ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. दादर-काझीपेठ साप्ताहिक गाडीला ५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. वरील गाड्यांच्या वेळेत, संरचना आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या गाड्यांचे लाभ घेण्याचे आवाहन ही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.