सोलापुरात दंगली घडवून आणायचा प्लॅन; फडणवीस, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न: प्रणिती शिंदे
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: June 15, 2024 18:50 IST2024-06-15T18:49:29+5:302024-06-15T18:50:28+5:30
कृतज्ञता मेळाव्यात केली टीका

सोलापुरात दंगली घडवून आणायचा प्लॅन; फडणवीस, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न: प्रणिती शिंदे
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटत असल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दंगली घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसे प्रयत्न देखील केले. यावर विश्वास बसत नसेल तर मतदानापूर्वीच्या पाच दिवसांंतील भाजप नेत्यांची भाषणे पहा, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी केली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात खा. शिंदे यांनी शनिवारी दुपारी कृतज्ञता मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ऐन मतदान दिवसी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदारांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मतदार केंद्राबाहेरून सातपुते यांना जाण्याची सूचना सीपींनी केली. सातपुते तेथून नाही गेल्यास त्यांच्या गुन्हा दाखल करणार असल्याचे सीपींनी सांगितले. त्यानंतर सातपुते तेथून परतले.
या मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, हरीष पाटील, सूरेश हसापुरे, सुभाष चव्हाण, बाळासाहेब शेळके, रमेश हासापुरे, नंदकुमार पवार, चेतन भाऊ, मनोज, हमगड्डी, बाटलीवाला, विजय हत्तुरे, सैफण, बेंजरापे, वरून सुर्वे, गंगाधर बिराजदार आदी उपस्थित होते.