सोलापूरचं विमान उडेना म्हणे उजनीत लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:27+5:302021-08-28T04:26:27+5:30

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजा ...

The plane from Solapur landed at Ujjain | सोलापूरचं विमान उडेना म्हणे उजनीत लँडिंग

सोलापूरचं विमान उडेना म्हणे उजनीत लँडिंग

googlenewsNext

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजा जवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरण जवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणाला ही मान्यता देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कालठणची जागा निश्चित केली आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी टेक्निकल एक्स्पर्ट यांनी त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. आता नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

------

उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी तांत्रिक तज्ज्ञांकडून पाहणी झाली. त्यांनी तीन ठिकाणांची पाहणी केली आहे. त्यापैकी इंदापूर जवळील कालठण हे ठिकाण सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आमच्याकडून ना-हकरत प्रमाणपत्र दिले जाईल.

_ रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी जलाशय व्यवस्थापन

---

पंढरपूर व हनुमान जन्मभूमीला सहजपणे जाता येणार

उजनी धरणातून विमानसेवा सुरू केल्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, लातूर यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांना विनाविलंब सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने कुगावच्या हनुमान जन्मभूमीला, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची ही सोय होणार आहे. त्यांना कमी वेळेत त्या ठिकाणी पोहचता येणार आहे. पर्यटन वाढीस ही मदत होणार आहे.

-----

Web Title: The plane from Solapur landed at Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.