नियोजन समिती प्रतिक्रिया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:27+5:302021-06-24T04:16:27+5:30
- ॲड. नंदकुमार पवार अध्यक्ष, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी ==================== शासकीय कमिटीसंदर्भात पालकमंत्री भरणे यांनी जी भूमिका मांडली ती ...
- ॲड. नंदकुमार पवार
अध्यक्ष, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी
====================
शासकीय कमिटीसंदर्भात पालकमंत्री भरणे यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. मंगळवेढा तालुक्यातील फाॅर्म्युला ६०, २०-२० असाच राहणार आहे.
- भारत बेदरे
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा
==========================
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय समित्यांवर शिवसेनेला २० टक्के कोटा असल्याचे समजते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये वरिष्ठ स्तरावरून जशी टक्केवारी ठरली असेल व आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे मिळणाऱ्या कोट्याप्रमाणे आम्ही काम करू. तथापि, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे मिळावी, अशी अपेक्षा.
- तुकाराम कुदळे
तालुकाप्रमुख, शिवसेना (मंगळवेढा)
===========================
पालकमंत्र्यांनी ठरवू अथवा अजून कुणीही ठरवू, हा निर्णय अमान्य आहे. याबाबत आमच्या पक्षाच्या संपर्कमंत्र्यांना पत्र दिले आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे, त्या पक्षाला ६० टक्के, इतरांना २०-२० फॉर्म्युला व जिथे भाजपाचा आमदार आहे, तिथे सर्वांना समान संधी ३०-३०-३० व मित्रपक्षाला १० असा फॉर्म्युला असेल, तरच आम्ही मान्य करू. याबाबत बसून बैठक घ्यावी. जिल्ह्याची कमिटी मुंबईच्या बैठकीत ठरविली जाईल.
- प्रकाश पाटील
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस आय, सोलापूर