एक तरी झाड लावा, मुलासारखे संगोपन करा : पालकमंत्री विजयकुमार देशमुख
By admin | Published: July 1, 2017 04:59 PM2017-07-01T16:59:50+5:302017-07-01T16:59:50+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. ०१ :- प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे मुलासारखे संगोपन करावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.
वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित चार कोटी वृक्ष लागवडीचा जिल्ह्यातील कार्यक्रम सिध्देश्वर स्मृती उद्यान येथे आज सकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी, इंडियन मॉडेल स्कूलचे अरविंद जोशी, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, ज्योती पाटील आणि उपवरसंरक्षक संजय माळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, ह्यप्रत्येक जिल्ह्यात किमान ३३ टक्के वनक्षेत्र असले पाहिजे. मात्र शहरीकरणामुळे वनाखालील क्षेत्र कमी होत आहे. त्याचा परिणाम वातावरणातील बदलावर होत आहे. त्याचा परिणाम वातावरणातील बदलावर होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. या सर्वावर उपाय म्हणून राज्य शासनाने राज्यात येत्या काही वर्षात ५० कोटी वृक्षरोपन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे़
पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि तापमानातील वाढ यावर वृक्षारोपणामुळेच कायस्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे राज्य शासनाच्या या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
यावेळी देशमुख, शोभा बनशेट्टी यांनी वृक्षारोपन केले. ग्रीन आर्मी, स्काऊटच्या विद्यार्थ्यांच्या हस्तेही वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वन आणि पर्यावरण यावर तयार करण्यात आलेल्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. उपविभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, हरिश्चंद्र वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.