ज्येष्ठांच्या निधनानंतर वृक्षारोपण अन्‌ तेथेच अस्थी विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:22+5:302021-07-04T04:16:22+5:30

माढा : घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर वृक्षारोपण व सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना अन्नदान करण्याचा निर्णय येथील चव्हाण कुटुंबीयांनी घेतला. ...

Plantation after the death of the elders and immersion of the bones there | ज्येष्ठांच्या निधनानंतर वृक्षारोपण अन्‌ तेथेच अस्थी विसर्जन

ज्येष्ठांच्या निधनानंतर वृक्षारोपण अन्‌ तेथेच अस्थी विसर्जन

Next

माढा : घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर वृक्षारोपण व सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना अन्नदान करण्याचा निर्णय येथील चव्हाण कुटुंबीयांनी घेतला. या ठिकाणीच अस्थी विसर्जन करून पुढील वर्षभर शहरातील गरजूंना अन्नदान करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

दहाव्या, अकराव्या दिवशीचा विधी किंवा मासिक श्राद्ध न करण्याचा निर्णयही चव्हाण कुटुंबीयांनी घेतला आहे. मंगळवारी सेवानिवृत्त ग्रामसेवक ज्ञानदेव चव्हाण यांचे निधन झाले होते. यावेळी किरण चव्हाण, रवींद्र चव्हाण व बाळासाहेब चव्हाण या बंधूंनी रुढी परंपरांना फाटा देण्याचा निर्णय घेत पर्यावरणपूरक व समाजोपयोगी धोरणांचा अवलंब केला आहे. यानुसार विविध जातीच्या २० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

शहरातील इन्स्पायर फाउंडेशनचीही याकामी मदत झाली आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक करण्यात येत आहे. झाडांच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यावर वडिलांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. यामुळे परिवारातील वीस सदस्यांचे प्रतीक म्हणून वीस झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

----

०१माढा०१

कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर माढ्यातील चव्हाण कुटुंबीयांनी वृक्ष लागवड करत तेथेच अस्थी विसर्जन केल्या.

---

Web Title: Plantation after the death of the elders and immersion of the bones there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.