मंद्रुप येथील हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:58+5:302021-07-08T04:15:58+5:30

---- दुधनीत बालभवन वाचनालयाचे उद्घाटन दुधनी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजी नगर तांडा दुधनी येथे राष्ट्रदल साने ...

Plantation at Hindu Cemetery at Mandrup | मंद्रुप येथील हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण

मंद्रुप येथील हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण

googlenewsNext

----

दुधनीत बालभवन वाचनालयाचे उद्घाटन

दुधनी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजी नगर तांडा दुधनी येथे राष्ट्रदल साने गुरुजी बालभवन वाचनालयाचे उद्घाटन दुधनी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश शटगार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक बसवराज हिरतोट होते. यावेळी दुधनी केंद्रातील एस.जी. परमशेट्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध आलेगाव, स्वामिनाथ महामुनी, शिवचलप्पा बाबा, श्रीकांत दळवी, राजेंद्र पवार, मल्लू कांबळे, सचिन होर्ती, आनंदराव इंगळे, अंबाराय उजनी, रविकुमार कोरगाव, नूरमहमद बागवान, राजू पाटील आदी उपस्थित होते.

---

पांगरी स्मशानभूमीस दहा लाख मंजूर

बार्शी : पांगरी येथील सार्वजनिक स्मशानभूमीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दहा लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे, अशी माहिती जि. प. सदस्या रेखा राऊत यांनी दिली. पांगरी स्मशानभूमीतील समस्या कमी करण्यासाठी जि. प. सदस्या राऊत यांनी यापूर्वीच जिल्हा परिषद फंडामधून तीन लाख रुपयांचा निधी दिला होता. त्या निधीतून स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीची सुरुवात करण्यात आली होती.

----

दुधनी येथील उरूस रद्द

हंजगी : दुधनी येथील हजरत पीर सय्यद बाहोद्दीन वली यांचा उरूस कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती हजरत पीर सय्यद बाहोद्दीन वली दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मौलाली मुजावर यांनी दिली आहे. यासंदर्भात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी कोरोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून कोणी दर्गाहकडे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन ट्रस्टच्या सदस्यांनी केले आहे.

---

भोसे येथे कृषीकन्यांनी केले वृक्षारोपण

करमाळा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न असलेल्या साईकृपा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या आरती बाळासाहेब सुरवसे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी जयंत वारे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील भोसे येथे वृक्षारोपण केले. यावेळी भोजराज सुरवसे, बाजार समितीचे संचालक वालचंद रोडगे, भारत सुरवसे, मुख्याध्यापक सुनील जाधव, सुनीता वारे, बबन सुरवसे, राम बडे, वनमाला सुरवसे, कुंडलिक सुरवसे, जयंत वारे, बाळासाहेब सुरवसे, निर्मला रोडगे, लता शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

----

पिसेवाडी येथे कोविड तपासणी शिबिर

माळशिरस : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिसेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांचे कोविड तपासणी शिबिर संपन्न झाले. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी `माझे मूल, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत पिसेवाडी, भाकरेवाडी, माळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसह ग्रामपंचायत पिसेवाडी, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कोविड तपासणी शिबिरही आयोजित केले होते. वेळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजित केल्याची माहिती पिसेवाडीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा पवार यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पिसाळ, समूह आरोग्य अधिकारी डॉ. पवार, डॉ. करिष्मा मुलाणी यांनी सहभाग घेतला. यावेळी सरपंच मोनिका शेंडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर साळुंखे, शामराव जाधव, संजय कदम आदी उपस्थित होते.

---

शेळगाव-करमाळा-अजंठानगर बस सेवा सुरू

करमाळा : करमाळा आगाराने शेळगाव-करमाळा-अजंठानगर अशी बससेवा प्रवाशांच्या मागणीनुसार नव्याने सुरू केली आहे. करमाळा तालुक्यातील बरेच रहिवासी हे अजंठानगर भागात असून त्यांना येणे जाणे सोयीचे व्हावे यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस शेळगाववरून सकाळी ९.१५ वाजता निघेल. या बसचा मार्ग शेळगाव-करमाळा-राशीन - भिगवण - हडपसर- स्वारगेट - शिवाजीनगर- शिमला ऑफिस सांगवी- काळेवाडी फाटा- औंध- डांगे चौक- अजंठानगर असा आहे.

--

Web Title: Plantation at Hindu Cemetery at Mandrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.