भाजयुमोकडून सांगोला रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:04+5:302021-09-08T04:28:04+5:30

सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपालिका यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ...

Plantation in a pothole on Sangola Road from Bhajyumo | भाजयुमोकडून सांगोला रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

भाजयुमोकडून सांगोला रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

Next

सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपालिका यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी हे गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले गेले.

सदरील रस्त्याबाबत बोलत असताना युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव म्हणाले ,

"हा रस्ता जुना सांगोला हायवे असून, दोन वर्षांपासून हा रोड पूर्णतः खराब अवस्थेत आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर एका तरुणाला जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपालिका सर्व कार्यालय हा रस्ता आमच्याकडे नाही असे सांगत आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता नगरपालिकेकडे वर्ग केला असून त्याचे पत्रदेखील त्यांनी दिले आहे. नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी अन्यथा दोन दिवसांनी भाजयुमो आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी दिला आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे, आदित्य हिंदुस्थानी, देवानंद इंगोले, आनंद माने, प्रदीप गायकवाड, महेश जाधव, अजित लेंडवे, विजय चव्हाण, विश्वास मोहिते, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी-

मंगळवेढा शहरानजीक सांगोला रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करताना माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, सुशांत हजारे, आदित्य हिंदुस्थानी, देवानंद इंगोले, आनंद माने.

070921\img-20210907-wa0042.jpg

फोटो ओळी-- मंगळवेढा शहरानजीक सांगोला रस्त्यावर असणाऱ्या खड्यात वृक्षारोपण करताना माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे , 

सुशांत हजारे , आदित्य हिंदूस्थानी , देवानंद इंगोले , आनंद माने

Web Title: Plantation in a pothole on Sangola Road from Bhajyumo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.