सोलापूर जिल्ह्यात स्प्रिंकलरव्दारे ८० एकरावर केली कांद्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:18 PM2018-10-02T17:18:58+5:302018-10-02T17:21:39+5:30
सामूहिक गटशेतीच्या माध्यमातून आले शेतकरी एकत्र
सोलापूर: सामूहिक गटशेतीच्या माध्यमातून मार्डीत स्प्रिंकलरच्या माध्यमातून ८० एकरांवर कांदा पीक घेतले असून, या पिकाची पाहणी कृषी खात्याच्या अधिकाºयांनी केली.
शासनाच्या गटशेतीला प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत मार्डी येथील लोकमंगल शेतकरी गटाची निवड करण्यात आली आहे. या गटातील शेतकºयांना १०० एकरांवर कांदा लागवडीचे उद्दिष्ट आहे. यापैकी ८० एकरांवर कांद्याची लागवड केली असून, या सर्व क्षेत्राला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिले जाते. कमी पाण्यावर चांगले पीक घेण्यासाठी कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. या गटाच्या माध्यमातून मार्डीतील शेतकºयांकडून सामूहिक शेततळे, पाईपलाईन, कांदा चाळ, पॅकिंग, प्रोसेसिंग असे कमी खर्चाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
८० एकरांवरील कांदा पीक अतिशय जोमात असून, अधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. कोरडवाहू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अमृतसागर, के.व्ही.के.चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उमेश बिराजदार, दक्षिणचे तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, मंडल कृषी अधिकारी दादासाहेब मेलगे, शेतकरी गटाचे काशिनाथ कदम, अंबीर बोंगे, कसीर कुडले, श्रीकांत वैदकर, संतोष तोडकर, राम फसके, कमलाकर माने, विशाल कदम, वासू कदम आदी उपस्थित होते.
सामूहिक शेतीचा प्रयोग: बिराजदार
च्प्रत्येक शेतकरी त्या-त्या हंगामात ती-ती पिके घेतो व त्यासाठी आवश्यक खर्च करतोच. मात्र याच शेतकºयांनी एकत्रित सर्व प्रकारचा खर्च केला व अधिक उत्पादनासाठी कृषी अधिकाºयांचे मार्गदर्शन घेतले तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. गटशेतीच्या माध्यमातून सामूहिक शेतीचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.