मोदींना आवडतं पद्मशाली जेवण, सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती
By दिपक दुपारगुडे | Published: January 19, 2024 02:00 PM2024-01-19T14:00:22+5:302024-01-19T14:00:38+5:30
कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.
सोलापूर : कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामाचे लोकर्पण आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती दिली.
माझ्या पुर्वाश्रमी, माझं सौभाग्य होतं की, महिन्यात तीन-चार वेळा आपले पद्मशाली कुटुंबे मला जेवण देत असत. ते छोट्या चाळीत राहायचे. तीन लोकांना बसयला देखील जागा नसायची. पण त्यांनी मला उपाशी झोपू दिलं नाही; पीएम मोदींनी सांगितलं.
तर सोलापूर हे उद्योगांचे, मेहनती कामगारांचे शहर आहे. येथे छोट्या आणि लघु उद्योगांशी लाखो लोक जोडलेले गेले आहेत. सोलापूरच्या कापड उद्योगाची ओळख देश आणि जगभरात आहे. सोलापुरी चादरीबद्दल सर्वांना माहिती असल्याचे मोदींनी सांगितलं.