पीएम किसानचे पैसे न भरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:06+5:302021-04-07T04:23:06+5:30
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपये खात्यावर जमा होत आहेत. ...
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपये खात्यावर जमा होत आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक एकूण सहा हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते.
सांगोला तालुक्यातील १५६५ आयकर भरणाऱ्या खातेदारांनी १ कोटी ५४ लाख ४४ हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या आयकर भरणाऱ्या ९६८ लाभार्थींनी १ कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा भरणा केला आहे. अजूनही ५९७ अपात्र खातेदाराकडून ३९ लाख १० हजार रुपये भरणा बाकी आहे.
कोट ::::::::::::::::::::
नोटीस मिळूनही पीएम किसान योजनेचे अनुदान परत करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांना ही शेवटची संधी दिली आहे. त्यानंतर मात्र अनुदान परत न करणाऱ्या खातेदारांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल.
- अभिजित पाटील,
तहसीलदार