वैरागमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यावरून पोलिसांचा लाठीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:59+5:302021-02-09T04:24:59+5:30
जमाव पोलीस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलीस निरीक्षक विनय बहीर व साहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी समजावून सांगितल्यानंतर तो ...
जमाव पोलीस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलीस निरीक्षक विनय बहीर व साहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी समजावून सांगितल्यानंतर तो परत जात होता. तेव्हा अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामध्ये महिलांसह सुमारे १० जण जखमी झाले. यामुळे चिडलेल्या जमावाचा उद्रेक झाल्यावर पोलिसांकडून गोळ्या घालण्याची भाषा झाली, तेव्हा संतप्त जमावाने सुमारे दोन तास वाहतूक बंद केली होती.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर हे घटनास्थळी दाखल झाल. तसेच वैराग, माढा, बार्शी शहर, बार्शी ग्रामीण व पांगरी येथील आठ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह सुमारे १०० पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला. तसेेच नागरिकांनी शांतता पाळावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केले.
यावेळी ‘गृहनिर्माण’चे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अरुण कापसे, वैरागचे प्रशासक एच. ए. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी भेटी देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
कोट ::::::
पुतळा बसविण्याची जागा ठरवायचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाचा आहे. आता तो ठेवायचा की काढायचा तोही निर्णय त्यांनीच घ्यावा.
- प्रदीप तहसीलदार,
तहसीलदार
कोट ::::::::::::
पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना घडलेल्या घटनेचा तपशील पाठविला आहे. समाजाताल प्रमुख नेत्यांना समजावून सांगितल्याने हा वाद थांबला आहे.
- अभिजित धाराशिवकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी
कोल्हापूरहून टेम्पोतून पहाटे आणला पुतळा
सदर पुतळा पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान कोल्हापूरहून मोहळमार्गे आयशर या मोठ्या टेम्पो ट्रकमधून आला. तसेत तो क्रेनच्या साहाय्याने गतवर्षी केलेल्या चबुतऱ्यावर चढवून मोठ्या प्रमाणात वेल्डिंग करून बसवला आहे. तरीदेखील गस्त घालणाऱ्या पोलिसांना याची खबरबात लागली नाही.
सदर नियोजित पुतळ्याची जागा २६ ऑक्टोबर २०१० रोजीच्या ठरावानुसार शिवस्मारक समितीला देण्यात आलेली आहे; परंतु स्थापनेची परवानगी नव्हती. मात्र नुकतीच समितीने शासनाकडे परवानगी मागितली आहे, असे ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना फोन अन् पुतळा काढण्याची प्रक्रिया थांबली
पोलीस ठाण्यामध्ये शहरातील प्रमुख नागरिकांबरोबर चर्चा करीत असताना पुतळा कोणी बसवला हे उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचारले. तेव्हा सर्वांनी ‘आम्ही नाही’ असे म्हटले. दरम्यान, शिवसेनेचे आंधळकर यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यानी बसवला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे. कोणच तयार नसेल तर मी बसवला म्हणतो’, असे म्हणत भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. तेव्हा तत्काळ पुतळा काढण्याची प्रक्रिया थांबली.
फोटो
०८वैराग०१
वैराग येथील शिवाजी चौकात जमलेला जमाव
०८वैराग०२
नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच पोलीस ठाण्यासमोर जमलेले कार्यकर्ते.
०८वैराग०३
वैराग येथील शिवाजी चौकात उभारलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा.