टँकरच्या धडकेने शाळकरी मुलगा ठार जमावाची दगडफेक: पोलिसांचा लाठीमार

By admin | Published: May 6, 2014 08:19 PM2014-05-06T20:19:31+5:302014-05-07T00:00:14+5:30

सोलापूर : पाण्याची वाहतूक करणार्‍या खाजगी टँकरची सायकलीस धडक लागल्याने स्विमिंगवरून घराकडे परतणारा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना पूर्व भागातील आंध्रदत्त चौकात मंगळवारी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरवर दगडफेक केली तर गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

Police baton of the police: Sticks to the police | टँकरच्या धडकेने शाळकरी मुलगा ठार जमावाची दगडफेक: पोलिसांचा लाठीमार

टँकरच्या धडकेने शाळकरी मुलगा ठार जमावाची दगडफेक: पोलिसांचा लाठीमार

Next

सोलापूर : पाण्याची वाहतूक करणार्‍या खाजगी टँकरची सायकलीस धडक लागल्याने स्विमिंगवरून घराकडे परतणारा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना पूर्व भागातील आंध्रदत्त चौकात मंगळवारी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरवर दगडफेक केली तर गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
सनी नागेश श्रीगिरी (वय १३, रा. सोलापूर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सातवीत शिकत होता. शाळेला सुट्या लागल्याने मार्कंडेय तलावात तो पोहण्याचा सराव करीत होता. सकाळी ११ वा. तलावाकडून तो घराकडे जाण्यासाठी सायकलवरून निघाला. आंध्रदत्त चौकातील सिंधूराम रेसीडेन्सीसमोरील पुलावर तो आला असता, समोरून पाण्याचा टँकर (एमटीएस ८९0१) वेगाने आला. टँकरने सनी याच्या सायकलीस ठोकरले. पुढचे चाक सायकलवरून गेले. गाल व डोक्याला मार लागून तो जागीच ठार झाला. घटनेनंतर टँकरचालक पळून गेला. सनीचे वडील वायरमन म्हणून मिळेत ते काम करतात. याप्रकरणी सनी याचे वडील नागेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक समीर नुरोद्दीन पीरजादे (वय ३५, रा. कोंडानगर, अक्कलकोटरोड सोलापूर) याला जेलरोड पोलिसांनी अटक केली. तपास महिला फौजदार पाटील करीत आहेत.
...
जमावावर पोलिसांचा लाठीमार
अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. संतप्त झालेल्या लोकांनी टँकरवर दगडफेक केली. माहिती मिळताच जेलरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

Web Title: Police baton of the police: Sticks to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.