गुन्ह्यांच्या तपास कामात मदत करण्यासाठी लाच मागणारा पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:16 PM2020-10-02T12:16:16+5:302020-10-02T12:16:48+5:30
सोलापूर लोकमत बे्रकींग
सोलापूर : गुन्ह्यांच्या तपासात मदत व पुढील कारवाई न करण्यासाठी १५ हजार रूपये लाचेची मागणी करून ३ हजार रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले़ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
इसामिया बाशामिया बहिरे (वय ३२, पद पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. ५९५, नेमणूक वैराग पोलीस स्टेशन, ता. बार्शी, जि. सोलापूर. रा. सध्या पोलिस कॉलनी, बार्शी. मूळ रा. परांडा जि. उस्मानाबाद) असे लाच स्वीकारणाºया पोलिस कर्मचाºयाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार याच्याविरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यांचे तपासात मदत करण्यासाठी व पुढील कारवाई न करण्यासाठी पो.कॉ. बहिरे यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती ५ हजार रूपये लाच देण्याचे ठरले़ मात्र त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३ हजार रूपये लाचेची रक्कम पो.कॉ. बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पो.ना. चंगरपल्लु, म.पो.ना. स्वामी, पो.शि. सनके, चालक पो.शी. सुरवसे यांनी केली.