२० हजाराची लाच घेताना मंगळवेढा येथील पोलीस कॉन्स्टेबल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:29 PM2018-10-01T21:29:59+5:302018-10-01T21:30:55+5:30

Police Constable detained at Mangalveda while taking a bribe of 20 thousand | २० हजाराची लाच घेताना मंगळवेढा येथील पोलीस कॉन्स्टेबल अटकेत

२० हजाराची लाच घेताना मंगळवेढा येथील पोलीस कॉन्स्टेबल अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेरात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात धरून आणलेल्या वाळूच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात २० हजारांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढ्यातून सांगलीकडे वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम. एच. ०९/सी. यु. ४७११) पोलिसांनी कारवाईसाठी ३० सप्टेंबर रोजी पकडली होती. ही कारवाई पोकॉँ सिद्धेश्वर मोरे यांनी पकडून मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात लावली होती. परंतु या गाडीवरील होणारी कारवाई थांबविण्यासाठी मोरे याने २० हजाराची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार आरिफ पटेल यांनी लाचलूचपत पुणे विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत अधिकाºाांनी सापळा १ आॅक्टोबर रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदारकडून २० हजाराची लाच घेताना पोकॉँ मोरे रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलूचपतचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय पतंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोरे यास ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Web Title: Police Constable detained at Mangalveda while taking a bribe of 20 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.