सोलापूरच्या रविवार पेठेतील पोलिसाला कोरोनाची लागण...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 06:40 PM2020-04-17T18:40:03+5:302020-04-17T19:48:55+5:30
सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३ वर
सोलापूर : शहरातील जोशी गल्ली, रविवार पेठेत कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण पहिल्या १२ रुग्णांच्या संपर्कातील नाही. दरम्यान, शहरातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या १३ वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दरम्यान, हा रुग्ण पोलीस असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवार पेठेत राहणारा हा रुग्ण मुंबई पोलिस दलात कामाला आहे. आठ दिवसांपूर्वी तो सोलापुरात आला होता. त्याच्या हातावर होम व्कारंटाइनचा शिक्का होता. त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तो उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाला. या ठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी त्याची स्वॅब चाचणी पॉझीटिव्ह असल्याचे आढळून आली.
आठ दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कातील १४८ जणांचे स्वॅब घेतल्यानंतर २ दोन जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील एका महिलेच्या संपर्कातील ९ जणांचा कोरोनाची लागण झाली होती. आता रविवार पेठेतील जोशी गल्लीमध्ये रुग्ण आढळून आला आहे.