जेेऊर येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:15+5:302021-06-25T04:17:15+5:30

पोलीस सूत्रांनुसार यातील सुरेश काशिनाथ चौगुले (रा. जेऊर) याची जेऊर ते दोड्याळ मधोमध उसाची शेती आहे. त्यात त्यांनी गांजाची ...

Police detain a farmer who cultivates cannabis in a field at Jeur | जेेऊर येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास पोलीस कोठडी

जेेऊर येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास पोलीस कोठडी

Next

पोलीस सूत्रांनुसार यातील सुरेश काशिनाथ चौगुले (रा. जेऊर) याची जेऊर ते दोड्याळ मधोमध उसाची शेती आहे. त्यात त्यांनी गांजाची लागवड केली आहे. ही बातमी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सपोनि प्रवीण संपांगे, फौजदार चंदू बेरड, हवालदार अजय भोसले, सिद्धाराम घंटे, सुभाष दासरी, ओंकार थिटे, महादेव शिंदे यांच्या पथकाने सापळा लावून धाड टाकली. यात हा प्रकार निदर्शनास आला.

पोलिसांनी धाडीत सुरेश चौगुले यास अटक केली. गुरुवारी (२४ जून) त्यास अक्कलकोटच्या न्यायालयात उभे केले असता, त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यात फिर्यादीतर्फे सरकारी वकील गिरीश सरवदे तर आरोपीतर्फे ॲड. विजय हर्डीकर यांनी काम पाहिले. अधिक तपास फौजदार बेरड करीत आहेत.

----

२४ अक्कलकोट-गांजा

जेऊर येथे शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी अटक केलेल्या सुरेश चौगुलेसह जप्त केलेला गांजा आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सपोनि प्रवीण संपांगे, फौजदार बेरड आदी पोलिसांची पथक.

Web Title: Police detain a farmer who cultivates cannabis in a field at Jeur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.