पोलीस अत्यावश्यक सेवेत, अवैध धंदेवाले तेजीत (कुजबुज)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:17+5:302021-06-17T04:16:17+5:30
सध्या २५ हून अधिक ठिकाणी जुगार अड्डे सुरू आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने कडक लॉकडाऊन सुरू केले. ...
सध्या २५ हून अधिक ठिकाणी जुगार अड्डे सुरू आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने कडक लॉकडाऊन सुरू केले. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. पोलीस सशा कामात व्यस्त असल्याची संधी साधून अवैध व्यावसायिक गैरफायदा घेत आहेत. दोन महिन्यांपासून कापड, इलेक्ट्रॉनिक्स, चप्पल, हॉटेल, किराणा, केशकर्तनालय, भाजीपाला, असे एक नंबर व्यवसाय बंद होते, तर जुगारासारखे दोन नंबर धंदे तेजीत सुरू आहेत.
बॅगेहळ्ळी रोड, निमगाव रोड, विकास मंगल कार्यालय, कारंजा चौक, शिवाजीनगर तांडा परिसर, अक्कलकोट स्टेशन, यांना जणू काय पोलिसांनी परवानगी दिल्यासारखे भरदिवसा उघडउघड सुरू ठेवलेले आहेत. तसेच ग्रामीण भागात किणी रोड, हसापूर रोड, वागदरी रोड, याबरोबरच वागदरी, किणी, हत्तीकणबस, सांगवी, हसापूर, सलगर, यांसह अनेक गावांत ग्रामीण भागात सुरू आहे.