वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पकडली गाढवं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:47 PM2019-08-01T12:47:56+5:302019-08-01T12:53:05+5:30
पंढरपुर पोलीसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारी ४३ गाढवे हलविली सांगलीला
पंढरपूर : चंद्रभागेचे वाळवंट पोखरुन नदीपात्रात वाळू उपसा करून खड्डे तयार करणाºया वाळू माफियांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वाळूचे उत्खनन करून गाढवांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करणाºया ४३ गाढवांना पकडले. या गाढवांना देखभालीसाठी पंढरपुरातून हलवून सांगलीतील अॅनिमल राहत फाउंडेशनच्या ताब्यात दिले आहे.
शहरातील चंद्रभागा नदीवरील उद्धव घाट, दत्त घाट, चंद्रभागा घाट, विप्रदत्त घाट व स्मशानभूमी आदी घाटावरून चोरटी वाळू वाहतूक होते. अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे मुख्य साधन असलेली गाढवंच जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ टाकलेल्या छाप्यात ४३ गाढवे आणि ३ ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे; मात्र या कारवाई दरम्यान वाळू माफिया पाण्यात उड्या टाकून पळून गेले.
यामुळे गाढवांच्या अज्ञात मालकांवर भादंवि ३७९, ३४ पर्यावरण कायदा कलम ९, १५ सह प्राण्याचे छळ प्रतिबंधक अधि. कलम १९६० चे कलम ३, ११, ३८ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ४ हजार ३०० किलो वजनाची वाळू, चार मोटरसायकली, वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाºया साहित्यांसह ४३ गाढवे असा एकूण ४ लाख ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.
चार पैकी दोन मोटरसायकली चोरीच्या
चंद्रभागा नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस गेले होते. यावेळी अज्ञात इसम त्याठिकाणी चार मोटरसायकली सोडून पळून गेले. त्या मोटरसायकलीची माहिती घेतल्यास त्यातील दोन मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.