सोलापूर शहरातील वराह पकडण्यासाठी पोलीसांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 07:10 PM2018-10-06T19:10:20+5:302018-10-06T19:13:08+5:30

Police help to catch the pig in Solapur city | सोलापूर शहरातील वराह पकडण्यासाठी पोलीसांची मदत

सोलापूर शहरातील वराह पकडण्यासाठी पोलीसांची मदत

Next
ठळक मुद्देशहरातील वराह हटाव मोहीम लवकरच राबविण्यात येणारभटकी जनावरे पकडण्यासाठी महापालिकेची मोठी शक्तीआतापर्यंत ३६८९ कुत्र्यांवर निबीर्जीकरण

सोलापूर : सोलापुरात डुकरांची समस्या गंभीर बनली असून लहान मुलावर हल्ले करणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे शहरातील भटके डुक्कर पकडण्याची मोहीम घेण्यात येणार असून यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे अशी माहिती आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांनी बैठकीत दिली.

शहरातील वाढत्या साथीच्या रोगात बद्दल महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली या बैठकीत फाईन ब्लू प्रतिबंध करण्यासाठी गोळ्यांचा साठा भटक्या कुत्र्यांपासून धोका होऊ नये म्हणून प्रतिबंध खरेदी यावर चर्चा करण्यात आली शहरात तीस हजार भटकी कुत्री आहेत या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निबीर्जीकरण मोहीम राबविण्यात येत आहे आतापर्यंत ३६८९ कुत्र्यांवर निबीर्जीकरण करण्यात आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संगीता जुने यांनी सांगितल्या़

 पवार नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर किसन जाधव यांनी शहरातील भटक्या डुकराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी ताजणे यांनी शहरातील डुक्कर पकडण्याची मोहीम घेण्यात येणार आहे़ त्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आल्याचे सांगितले़ त्यावर आयुक्त ढाकणे यांनी खुलासा करताना डुक्कर पकडणे जिकरीचे काम आहे त्यामुळे डुक्कर पालन करणाºया मालकांकडून उपद्रव होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

लोकांमुळे अनेक समस्या होत आहेत शहरात असणाºया हॉटेलमधील उरलेले खरकटे जगविली जातात व दिवसभर भटकण्यासाठी सोडले जातात. खरकटे अन्न खाऊन असलेली लहान मुले महिलांवर हल्ला करीत आहेत तसेच गटारीत लोणार या गुणांमुळे साथीचे गंभीर आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे शहरातील डुक्कर हटाव मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी लोकांना बंदिस्त करता येईल काय अशी विचारणा केली त्यावर असे करणे शक्य नाही, भटकी जनावरे पकडण्यासाठी महापालिकेची मोठी शक्ती लागत आहे़ दररोज दहा ते पंधरा जनावर पकडणे शक्य होते अशा इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना पकडून बाहेर नेऊन सोडणे हाच पर्याय आहे.

Web Title: Police help to catch the pig in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.