तोतयागिरी करून पोलीस निरीक्षकांनाच गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:25+5:302020-12-06T04:23:25+5:30
४ डिसेंबर रोजी स. ८ च्या सुमारास वरील मोबाईलधारकाने सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्ष येथील शिंदे यांना पोलीस निरीक्षक जाधव ...
४ डिसेंबर रोजी स. ८ च्या सुमारास वरील मोबाईलधारकाने सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्ष येथील शिंदे यांना पोलीस निरीक्षक जाधव आय. जी. कंट्रोल येथून बोलत आहे. पोलीस निरीक्षक गवळी यांना या नंबरवर फोन करण्यास सांगा असा निरोप दिला. त्याप्रमाणे राजेश गवळी यांनी त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला किती कर्मचारी निलंबित आहेत, अशी विचारणा करून डीओना (दप्तरी) यांना फोन करण्यास सांगा असे सांगितले. त्याप्रमाणे पोलीस नाईक प्रमोद गवळी यांनी सांगोला पोलीस ठाण्याकडील निलंबित अधिकारी, कर्मचारी यांची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक गवळी यांनी हा नंबर कोणाचा आहे, कोण बोलत आहे, याची माहिती घेण्याकरिता त्या नंबरवर फोन लावला असता पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आय.जी. कंट्रोल असल्याचे कबूल केले. नंतर रामचंद्र जाधव बोलतोय, असे सांगितले. यावर गवळी यांनी एवढ्यावरच न थांबता तुमची नेमणूक केव्हापासून, बॅच कोणती आहे वगैरे अधिक माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला.
त्यामुळे गवळी यांना संशय आल्याने या नंबरची व्यक्ती पोलीस निरीक्षकाचे पद धारण करीत नाही हे त्यास माहीत असताना व पदधारक असल्याची बतावणी व तोतयागिरी करून पोलीस ठाण्याकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांची फोनद्वारे माहिती घेतली. याबाबत त्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.