सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून लूट सुरूच, ट्रकचालक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:53 AM2018-12-24T10:53:34+5:302018-12-24T10:56:00+5:30
ट्रकचालक वैतागले : टेंभुर्णी परिसरात दोनवेळा पोलिसांकडून लूट
अरण : देखो साहब, मैं पिछले तीस सालसे हायवे लाईनपर गाडी चलाता हूँ, पुलिसवाले एंट्री तो इस देशमें हर जगह पर ले रहे है! लेकिन टेंभुर्णी के आसपास में हमे दो-दो बार एंट्री के लिए पुलीस परेशान करती है! एंट्री तो लेती है। उपर से गालियाँ देती है, डाँटती है, कभी थप्पड झेलनी पडती है। तो कभी-कभी गाडीके काँचपर पुलीस का डँडा पडता है! हे बोल आहेत पोलिसांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या ट्रक ड्रायव्हरचे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन चालकांची पिळवणूक करतात. टेंभुर्णी पोलिसांच्या कचाट्यातून सुटतो न सुटतो तोच हायवे पोलीस ताव काढतात. त्यामुळे भीमानगर ते शेटफळ आणि कंदर ते शेटफळ हा मार्ग म्हणजे ट्रक चालकांना अडचणींचा चक्रव्यूह भेदल्यासारखे वाटते.
जयपूर ते कोईम्बतूर आणि मुंबई ते चेन्नई या मार्गावरील सर्वात डेंजर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीस किलोमीटरचा हायवे असल्याचे ट्रक ड्रायव्हरनी सांगितले.
हायवे पोलीस म्हणतात, आम्हाला वर्षाला सव्वा ते दीड कोटी रुपये दंडाची रक्कम गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे आम्ही केसेस करतोय. पण मग पांढरा कागद असणारा बिल्ला दाखवून जाणाºया वाहन चालकाला कसे काय सोडता, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही.
पोलिसातच बाचाबाची
- टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस व मोडनिंबचे हायवे पोलीस यांच्यात एंट्री वसुलीवरुन नेहमी बाचाबाची होते. या दोघांत छुपा सवती मत्सर दिसून येत आहे. हाच तो पांढºया कागदाचा बिल्ला. हा बिल्ला ५ डिसेंबरला दिला आहे. ४ जानेवारीपर्यंत चालणार आहे. १०० ते ३०० रुपये हप्ता घेऊन हायवे पोलीस हा बिल्ला देतात, असे ट्रक चालकांनी सांगितले.