सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलीसांच्या धाडी; ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १५ आरोपी ताब्यात, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:27 PM2018-02-15T12:27:30+5:302018-02-15T12:28:37+5:30
जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही धाडीत एकूण १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही धाडीत एकूण १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुर्डू येथे जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार खबºयाकडून विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार धाड टाकली असता कुर्डू ते लऊळ हद्दीच्या शिवारात पोपट माळी यांच्या वीटभट्टीच्या मागे मन्ना नावाचा जुगार चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या धाडीत २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले. यामध्ये पोपट नरसू माळी, संतोष संताजी पाटील, संभाजी कृष्णा गायकवाड, मोहन रघुनाथ उपासे, बिभीषण राजाराम जगताप, दत्ता बापू गायकवाड, हणमंत रामचंद्र जगताप (सर्व रा. कुर्डू, ता. माढा) यांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. या आरोपींविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
दुसरी धाड अक्कलकोट शहरामध्ये ए-वन चौक, विजय चौक व कारंजा चौकातील मटका बुकीवर टाकण्यात आली. यात १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ८ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये खासीम गुलाब शिकलगार (वय ३२, रा. स्टेशन रोड, अक्कलकोट), स्वामीराव मारुतीराव लोखंडे (वय ५५, रा. जैन मंदिरासमोर, अक्कलकोट), दीपक बाळू फुटाणे (वय २२, रा. जुना अडत बाजार अक्कलकोट), अभिजित विक्रम पवार (वय ३५, रा. समर्थनगर), लतिफ हनिफ सातलगाव (वय ५६, रा. नागनहळ्ळी), अकबर हबीर सुतार (वय ३३, रा. संजयनगर, अक्कलकोट), सैफन हबीर सुतार (वय ३८, रा. अक्कलकोट), प्रशांत सुरेश जमादार (वय २६, रा. मैंदर्गी) यांचा समावेश आहे.
कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनि संदीप धांडे, हवालदार अंकुश मोरे, पोलीस अमृत खेडकर, बाळराजे घाडगे, सुरेश लामजाने, सागर ढोरे-पाटील, अमोल जाधव, बालाजी नागरगोजे, फौजदार जी. एच. निंबाळकर , हवालदार मनोहर माने, पो.कॉ. अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, श्रीकांत जवळगी, अनुप दळवी, सुरेश लामजाने, विलास पारधी, सिद्धाराम स्वामी, विष्णू बडे यांच्या पथकाने केली.
------------------------
अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम
- जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना रेकार्डवरील गुन्ह्याबरोबर जुगार, मटक्याच्या विरोधात कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई निरंतर सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.